शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:45 AM

रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेशित करत रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक : रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेशित करत रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या.  महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी वडाळागाव येथे रस्त्यात असलेले धार्मिक स्थळ हटविण्यात आले; परंतु रस्त्यांत ठाण मांडून बसलेल्या झोपड्या हटविण्यात येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सूर्यकांत लवटे यांनीही नाशिकरोड परिसरात झालेल्या अतिक्रमणांबद्दल प्रश्न उपस्थित करत सदर अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त का मिळत नाही, असा सवाल केला. यावेळी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे प्राधान्यक्रमाने काढून घेण्याचे आदेशित केले. दरम्यान, मुकेश शहाणे यांनी ठरावीक प्रभागांनाच क्रीडा निधीतून व्यायामशाळांचे साहित्य वाटप होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि वजा तरतूद असतानाही निधी वाटपाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बिटको रुग्णालयात आग प्रतिबंधक व आगशोधक यंत्रणा बसविण्याच्या प्रस्तावाला सदस्यांनी हरकत घेतली. अग्निशमन दलाचे प्रमुख हे गैरहजर असल्याने आणि त्यांच्या कारभाराविरुद्ध प्रचंड तक्रारी असल्याने सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. मुशीर सय्यद यांनी अशोका मार्गावर दुभाजक व पथदीप नसल्याची तक्रार केली. यावेळी शहर अभियंता उत्तम पवार यांनी त्याबाबत तरतूद करण्याची ग्वाही दिली. भागवत आरोटे यांनी भंगार बाजार हटविल्यानंतर नियुक्त केलेल्या पथकांकडून होणाºया कार्यवाहीबद्दल शंका उपस्थित केली. सुनीता पिंगळे यांनी पंचवटी प्रभागात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन होऊनही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.यावेळी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी काही शेतकºयांचा विरोध असल्याचे सांगितल्यावर सभापतींनी महापालिकेची जागा असताना तत्काळ काम सुरू करण्याचे आदेशित केले. अलका अहिरे यांनी डेंग्यूच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुशीर सय्यद यांनी पेस्टकंट्रोलच्या ठेक्याबाबत कार्यवाहीचा तपशील मागितला असता सभापतींनी वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सदर ठेका रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशित केले. मुकेश शहाणे यांनी खासगी मोबाइल कंपन्यांच्या लागणाºया फलकांकडून महापालिकेने करवसुली करावी, अशी मागणी केली. वैद्यकीय विभागात लवकरच फेरबदल वैद्यकीय विभागात विविध रुग्णालयांमध्ये वर्षानुवर्षांपासून एकाच ठिकाणी कर्मचारी कार्यरत असल्याचे सूर्यकांत लवटे यांनी सांगितले. सदर कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच रात्रपाळीच्या सफाईसाठीही कर्मचारी बदलण्याची सूचना लवटे यांनी केली. यावेळी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी वैद्यकीय विभागातील कर्मचाºयांचा सर्व्हे करून त्याबाबतचा प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा