शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

देवळालीकरांना संसरीत अंत्यसंस्काराला ग्रामस्थांचा नकार

By श्याम बागुल | Updated: September 9, 2018 16:44 IST

देवळाली कँम्पच्या नागरीकांंच्या अंत्यविधीसाठी संसरीगावच्या दारणातीरी असलेल्या स्मशानभूमी जवळ पडते. त्यामुळे देवळालीच्या नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याऐवजी संसरी गावालगत स्मशानभूमीचा वापर केला जातो

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा ठराव : मृत्युचा दाखला, लाकडे न देण्याचा निर्णय रस्ताने परततांना विधीच्या राहिलेल्या वस्तु व साहित्य संबंधितांकडून टाकून दिले जाते.

नाशिक : देवळाली कँम्प परिसरातील नागरिकांना दारणातिरी संसरी गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार न करू देण्याचा ठराव संसरी ग्रामपंचायतीने केला असून, त्यामुळे आगामी काळात कॅम्पवासियांना मरणोत्तर विधीसाठी खडतर मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.देवळाली कँम्पच्या नागरीकांंच्या अंत्यविधीसाठी संसरीगावच्या दारणातीरी असलेल्या स्मशानभूमी जवळ पडते. त्यामुळे देवळालीच्या नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याऐवजी संसरी गावालगत स्मशानभूमीचा वापर केला जातो. उत्तर विधीनंतर संसरीच्या स्मशानभूमीची स्वच्छता न करतात रस्ताने परततांना विधीच्या राहिलेल्या वस्तु व साहित्य संबंधितांकडून टाकून दिले जाते. या संदर्भात संसरी ग्रामपंचायतीने चार वर्षांपासून कँन्टोमेंन्ट प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्यांचे लक्ष वेधले व संसरीच्या स्मशानभुमीचा देवळाली वासियांकडून होत असलेल्या वापरामुळे तिची स्वच्छता व देखभाल केली जावी अशी मागणी केली. परंतु कॅन्टोंमेट प्रशासनाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याने या पुढे देवलालीच्या नागरीकाना गावात अंत्यविधी करण्यास ग्रामस्थांनी विरोध करत कँन्टोमेंन्ट प्रशासनाने बांंधलेली स्मशानभूमीचा वापर करावा असा ठराव केला. संसरी गावात स्मशानभूमीत देवळालीवासियांना अंतिम संस्कार करता येणार नसून, केल्यानंतर ग्रामपंचायतीकडून मृत्युचा दाखलाच न देण्याचाही उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. शिवाय यापुढे अंत्यविधीसाठी लाकडे किंवा मृत्यु दाखला ग्रामपंचायतीच्या वतीने न देण्याचेही ठरविण्यात आले आहे.........................................................................चौकट===कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांकडून स्मशानभुमीची पाहणीसंसरी ग्रामपंचायतीने स्मशानभुमीचा वापर करू देण्यास नकार दिल्याने कॅन्टोंमेंटच्या नगरसेवकांसह लष्करी पदाधिकारींंनी स्मशानभुमीची पाहणी केली. जुन्या स्टेशन जवळील रेल्वे केबिन जवळील पुला खालून रस्ता तयार करून नवीन स्टेशनवाडी भागातून कॅन्टोन्मेंट नदी किनारी नवीन स्मशान भूमी उभारली जाऊ शकते का याबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वेच्या परवानगीने या मार्गावरून मोठी वाहने देखील जाऊ शकतात ही बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याबाबत सर्व अहवाल तयार करून बोर्डाच्या आगामी बैठकीत ठेवण्याचे व त्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडियर पी.रमेश, उपाध्यक्ष मीना करंजकर, नगरसेवक दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार,अभियंता विलास पाटील,माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर,राजू ठाकूर उपस्थित होते.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक