शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तूट आहे कोटींची, पर्वा नाही लुटीची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:34 IST

महापालिकेच्या अंदाजपत्रकात यंदा घसघशीत एक हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. मग, काय झाले.... असेल मोटार चकचकीत दारी तरच जनसेवेसाठी भ्रमंती करेल स्वारी.. असाच जणू विचार करीत नाशिक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अर्धा डझन मोटारी दिमतीला आणण्याचे ठरवले आहे.

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात यंदा घसघशीत एक हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. मग, काय झाले.... असेल मोटार चकचकीत दारी तरच जनसेवेसाठी भ्रमंती करेल स्वारी.. असाच जणू विचार करीत नाशिक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अर्धा डझन मोटारी दिमतीला आणण्याचे ठरवले आहे. आयुक्तांची एक मोटार बिघडल्याचे निमित्त झाले आणि ‘होऊ द्या खर्च’ म्हणून महापौरांसह पाच पदाधिकाºयांनीदेखील नव्या मोटारी खरेदी करण्याचा घाट घातला असून, त्यासाठी सव्वा कोटींची उधळण करण्याचे बेत तयार झाले आहेत.महापालिकेचे विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे हे सहा-सात वर्षांपूर्वीची कोरोला मोटार वापरत आहेत. आयुक्तपदी संजय खंदारे असताना ही मोटार खरेदी झाली होती. मोटारीची अवस्था खराब झाली तर आहेच, परंतु काही सुटे भाग मिळत नसल्याने चार दिवसांपासून ही मोटार जागीच उभी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खरे तर अगोदरच आयुक्तांसाठी मोटार घेण्याचे ठरले होते. मग, महापौरांसाठीदेखील मोटार घेण्याचे ठरले. महापौरांकडे नवी मोटार आल्यानंतर त्यांची सध्याची मोटार ही उपमहापौरांना वापरण्यासाठी देण्याचे नियोजन होते. विशेष म्हणजे महापौर सध्या वापरत असलेली मोटार ही मनसेचे अशोक मुर्तडक यांच्या महापौर असतानाच्या कारकिर्दीतील आहे. म्हणजे त्याला जेमतेम अवघे दोन ते अडीच वर्षे झाली आहेत. परंतु ती आता उपमहापौरांना देण्याचे प्रयत्न सुरू आहे. आयुक्त आणि महापौरांना नवी मोटार, मग त्यांनी तरी काय घोडे मारले, दुय्यम असले तरी ते मानाचेच पद आहे ना...मग त्यांच्यासाठी नवी मोटार घ्यायची तर इतरांनी काय पाप केले. शेवटी सारेच महत्त्वाचे कारभारी...मग यादी वाढत गेली आणि आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याबरोबरच महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि इतकेच नव्हे तर ज्यांच्या आर्थिक पाठबळाशिवाय हे शक्य नाही त्या तिजोरीच्या चाव्या सांभाळणाºया स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांच्यासाठीदेखील मोटार घेण्याचे ठराव सभागृहनेता दिनकर पाटील यांनी मांडला आणि मुकेश शहाणे या सदस्याच्या शीर्षपत्रावर ठरावात उपसूचना म्हणून मांडण्यात आली आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कोणा भूखंडधारकाला २१ कोटी मोबदला देण्याऐवजी टीडीआर देण्यासाठी संघर्ष करणारे लोकप्रतिनिधी ते हेच काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडण्यास हरकत नाही, परंतु एक इनोव्हा वीस-बावीस लाखांची एकूण सहा इनोव्हा मोटारींसाठी सव्वा कोटी! हा खर्च फार वाटत नसावा, महापालिकेचे एकूण बजेट असलेल्या दीड हजार कोटींच्या गंगाजळीत सव्वा कोटींचा खर्च म्हणजे दरिया में खसखसच.... म्हणूनच ‘होऊ द्या खर्च’ असे म्हणत सर्वच लोकप्रतिनिधी तयार झाले असावेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक