फर्निचर दुकानांचे अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: December 28, 2015 23:43 IST2015-12-28T23:39:35+5:302015-12-28T23:43:06+5:30
फर्निचर दुकानांचे अतिक्रमण हटविले

फर्निचर दुकानांचे अतिक्रमण हटविले
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नाशिक पश्चिम विभागातील दादोजी कोंडदेवनगर तसेच महात्मानगर येथील फर्निचरच्या दुकानांनी इमारतीच्या सामासिक अंतरात उभारलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली. महापालिकेच्या या मोहिमेमुळे दुकानमालकांनी नंतर स्वत:हून बांधकाम काढून घेणे पसंत केले.
महापालिकेच्या नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयाने दादोजी कोंडदेवनगर येथील मोहिनी घनश्याम अपार्टमेंटमधील फर्निचरच्या दुकानासमोर उभारलेले पत्र्याचे शेड हटविले. याठिकाणी देव्हारे, सोफासेट्स आदि वस्तूंमुळेही अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर महापालिकेने महात्मानगर येथील देवकी अपार्टमेंटच्या इमारतीत असलेल्या ओम फर्निचरविरुद्धही कारवाईचा बडगा उगारला असता दुकानमालकाने स्वत:हून पत्र्याचे शेड व साहित्य हटविले. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)दादोजी कोंडदेवनगर येथील फर्निचर दुकानाचे हटविण्यात येणारे साहित्य.