शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात

By admin | Updated: February 27, 2017 00:45 IST

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शहरातील सर्वपक्षीय उमेदवार भाजपाविरोधातच एकवटले आहेत.

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच  आक्रमक झाले असून, शहरातील सर्वपक्षीय उमेदवार भाजपाविरोधातच एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपाने लोकशाहीविरोधी कृत्य करून सत्ता मिळविल्याचा आरोप करून विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांचे पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांसह याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांच्या बैठकीत घेण्यात आला. हुतात्मा स्मारक येथे पराभूत उमेदवारांनी रविवारी (दि.२६) बैठक घेऊन निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्यासाठी कोर कमिटीची स्थापना केली आहे. सर्वपक्षीय उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपाने लोकशाही प्रक्रियेतून सर्वसामान्य नागरिकांना हद्दपार करण्याचा घाट घातला असून, निवडणुक प्रक्रियेत मतदार याद्यांमध्ये घोळ करून अनेक मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्याचप्रमाणे इव्हीएम मशीनमध्येही छेडछाड करण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय उमेदवारांनी केला आहे.  इव्हीएमच्या सुरक्षा यंत्रणेतही मोठ्या प्रमाणात कुचराई झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला असून, निवडणूक आयोगाच्या नियोजनाविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेत ३ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सत्ताधारी भाजपा व निवडणूक आयोगाविरोधात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय उमेदवारांनी घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिके साठी पुन्हा मतदानप्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात येणार असून, यावेळी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीचे आयोजक डॉ. डी.एल. कऱ्हाड, संजय अपरांती यांच्यासह सर्व ३१ प्रभागांमधील पराभूत उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांपैकी २२ जणांच्या क ोर कमिटीची स्थापन करण्यात आली असूनही कोर कमिटी निवडणूक अयोगाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)