पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात
By Admin | Updated: February 27, 2017 00:45 IST2017-02-27T00:45:28+5:302017-02-27T00:45:40+5:30
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शहरातील सर्वपक्षीय उमेदवार भाजपाविरोधातच एकवटले आहेत.

पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शहरातील सर्वपक्षीय उमेदवार भाजपाविरोधातच एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपाने लोकशाहीविरोधी कृत्य करून सत्ता मिळविल्याचा आरोप करून विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांचे पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांसह याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांच्या बैठकीत घेण्यात आला. हुतात्मा स्मारक येथे पराभूत उमेदवारांनी रविवारी (दि.२६) बैठक घेऊन निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्यासाठी कोर कमिटीची स्थापना केली आहे. सर्वपक्षीय उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपाने लोकशाही प्रक्रियेतून सर्वसामान्य नागरिकांना हद्दपार करण्याचा घाट घातला असून, निवडणुक प्रक्रियेत मतदार याद्यांमध्ये घोळ करून अनेक मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्याचप्रमाणे इव्हीएम मशीनमध्येही छेडछाड करण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय उमेदवारांनी केला आहे. इव्हीएमच्या सुरक्षा यंत्रणेतही मोठ्या प्रमाणात कुचराई झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला असून, निवडणूक आयोगाच्या नियोजनाविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेत ३ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सत्ताधारी भाजपा व निवडणूक आयोगाविरोधात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय उमेदवारांनी घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिके साठी पुन्हा मतदानप्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात येणार असून, यावेळी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीचे आयोजक डॉ. डी.एल. कऱ्हाड, संजय अपरांती यांच्यासह सर्व ३१ प्रभागांमधील पराभूत उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांपैकी २२ जणांच्या क ोर कमिटीची स्थापन करण्यात आली असूनही कोर कमिटी निवडणूक अयोगाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)