न्यायडोंगरी येथे हरणाचा मृत्यू
By Admin | Updated: September 21, 2016 00:03 IST2016-09-20T23:59:53+5:302016-09-21T00:03:22+5:30
हळहळ : वनविभागाची उदासीनता

न्यायडोंगरी येथे हरणाचा मृत्यू
न्यायडोंगरी : येथे प्रसूतीदरम्यान हरणाच्या मादीचा मृत्यू झाला. वनविभागास याबाबतची माहिती मिळुन देखील अधिकारी तीन तास उलटूनहि घटनास्थळी दाखल न झाल्याचे उघड झाले.
न्यायडोंगरी गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर वनक्षेत्र असून वॉचमन रफिक शेख सायंकाळी सहा वाजेदरम्यात राखण करत असताना सदर हरणाची मादी प्रसूत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या मादीस वेदना होत असल्याने शेख यांनी खासगी डॉक्टरांकडे आणले असता स्थानिक डॉक्टरांनी मादी हरणाला वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र मादीने पिलासह प्राण सोडला. हरणमादी मृत झाल्याची माहिती शेख यांनी वनविभागास कळवली. मात्र तीन तास उलटूनही अधिकारी आलेच नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. (वार्ताहर)