शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 22:49 IST

पिंपळगाव बसवंत : वाट भरकटलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या त्या हरणाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव बसवंत शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकळपातील हरीण चुकून शहरातील दगूनाना मोरेनगर भागात आले.

पिंपळगाव बसवंत : वाट भरकटलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या त्या हरणाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव बसवंत शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरणांचा कळप जात असताना कळपातील हरीण चुकून शहरातील दगूनाना मोरेनगर भागात आले. त्यावेळी त्याच्यावर मोकाट कुत्र्यांची नजर गेली. त्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने ते सैरावैरा पळू लागले. कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याने कुत्र्यांनी लचके तोडून त्याला गंभीर जखमी केले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी लगेच ग्रामपंचायतीचे आरोग्यप्रमुख योगेश विधाते यांना त्याची माहिती दिली. त्यांनी वन कर्मचाऱ्यांना कळविले. मात्र वन कर्मचारी घटनास्थळ गाठेपर्यंत हरणाचा मृत्यू झाला होता. यावेळी वन विभागाचे नाना चौधरी, टेकणार यांनी मृत हरणाला ताब्यात घेत पंचनामा केला.

टॅग्स :forestजंगलDeathमृत्यू