भाजप ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:13 IST2021-02-12T04:13:49+5:302021-02-12T04:13:49+5:30

मालेगाव : भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मालेगावचे ज्येष्ठ नेते दीपक पवार यांची निवड करण्यात ...

Deepak Pawar as State Vice President of BJP OBC Cell | भाजप ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक पवार

भाजप ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक पवार

मालेगाव : भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मालेगावचे ज्येष्ठ नेते दीपक पवार यांची निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, योगेश टिळेकरांसह कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत किसान मोर्चा व ओबीसी मोर्चा सक्रिय करण्याबाबत चर्चा झाली. पुणे येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर व जयकुमार रावल यांच्या हस्ते दीपक पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पवार यांच्यावर उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यावेळी मालेगावचे ज्येष्ठ नेते सुनील गायकवाड, बाळासाहेब कंकराळे, दादा जाधव, रवी साळुंखे, नानासाहेब मोरकर, पंकज शेवाळे, डॉ. हेमंत मगर, कैलास सानप, मुन्ना जाधव, स्वप्नील पाटील, भावसिंग पवार, लखन पवार, कैलास शर्मा, नाना मोरे, किरण देवरे, राजेंद्र आहिरे, वाल्मिक पवार, नरेंद्र पवार, आप्पा अग्रवाल, दीपक देसले, कमलेश निकम, अरुण सोनवणे, चेतन महाले, राजेंद्र वाणी, संभाजी घुमरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Deepak Pawar as State Vice President of BJP OBC Cell