शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

दिपक पाण्डेय यांनी गंगा-गोदावरीला नमन करत स्विकारली पोलीस आयुक्तपदाची सुत्रे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 1:43 PM

पाण्डेय यांनी नाशकात येताच त्र्यंबकराजाला हात जोडून नमस्कार करत कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बळ दे असेच जणू साकडे घातले असावे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाहीत्र्यंबकेश्वर येथे जाऊन बाहेरून दर्शन घेत नंतर रामकुंडावर हजेरी

नाशिक : मुंबई येथून शुक्रवारी (दि.४) भल्या पहाटे नवनियुक्त पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय हे कुंभनगरी व वाईन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात दाखल झाले. पाण्डेय यांनी शहरात येताच सर्वप्रथम रामकुंडावर भेट देत गंगा-गोदावरीचे पुजन केले. त्यानंतर आयुक्तालयात हजेरी लावत मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला.पाण्डेय हे मुंबईत सुधार सेवा विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते. ते १९९९ भारतीय पोलीस सेवेच्या तुकडीचे (आयपीएस) अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई, अकोला, राजभवन आदी ठिकाणी सेवा बजावल्या आहेत. नांगरे पाटील यांना मुंबईला सहआयुक्तपदाचा पदभार स्विकारण्यासाठी हजर व्हायचे असल्याने सकाळीच पदग्रहणाची औपचारिकता पुर्ण करण्यात आली. त्यानंतर तत्काळ नांगरे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पाण्डेय यांनी अद्याप दुपारपर्यंत आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. नाशिक पुण्यनगरीत दाखल होताच सर्वप्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन बाहेरून दर्शन घेत नंतर रामकुंडावर हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. एकूणच गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी पाण्डेय यांच्याकडून पोलीस बंदोबस्ताबाबतच्या उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. कारण यापुर्वी न्यायालयानेसुध्दा गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. पाण्डेय यांनी नाशकात येताच प्रथम रामकुंडाला भेट दिल्यामुळे आता पुन्हा गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहर पोलीस सरसावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पाण्डेय यांनी नाशकात येताच त्र्यंबकराजाला हात जोडून नमस्कार करत कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बळ दे असेच जणू साकडे घातले असावे. त्यानंतर कुंभमेळ्याचे शाहीस्नान व ध्वजारोहण ज्या दक्षिणगंगा अर्थात गोदावरीच्या पवित्र अशा रामकुं डावर होते, तेथेही भेट देत गोदामाईला नमन केले. एकूणच नवनियुक्त पाण्डेय यांनी शहराच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारण्यापुर्वी धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलgodavariगोदावरीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर