दीपकुमार मीना सीईओ म्हणून रुजू

By Admin | Updated: May 12, 2017 01:31 IST2017-05-12T01:31:25+5:302017-05-12T01:31:49+5:30

नाशिक : दीपकुमार मीना यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदाची सूत्रे स्वीकारली.

Deepak Kumar Meena as CEO | दीपकुमार मीना सीईओ म्हणून रुजू

दीपकुमार मीना सीईओ म्हणून रुजू

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी म्हणून असलेले दीपकुमार मीना यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर गुरुवारी (दि.११) त्यांनी लगेचच पदाची सूत्रे स्वीकारली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांची पुण्याला आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी पांढरकवडा (यवतमाळ) आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी म्हणून असलेले दीपकुमार मीना यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली होती. गुरुवारी त्यांनी पदाची सूत्रे शंभरकर यांच्याकडून स्वीकारली. त्यानंतर दुपारी सर्वसाधारण सभेस त्यांनी हजेरी लावली. २०१३ च्या भारतीय प्रशासन सेवेतील बॅचचे ते अधिकारी असून, प्रशिक्षणार्थी पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांना नाशिक जिल्हा परिषदेच्या सारख्या मोठ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याची संधी लाभली आहे.

Web Title: Deepak Kumar Meena as CEO