सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST2021-06-10T04:10:45+5:302021-06-10T04:10:45+5:30

---------------- वंचित लाभार्थींची यादीत समावेशाची मागणी ब्राह्मणगाव : येथे ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थींची ड यादी प्रसिद्ध झाली ...

Dedication of Sanitary Napkin Vending Machine | सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे लोकार्पण

सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे लोकार्पण

----------------

वंचित लाभार्थींची यादीत समावेशाची मागणी

ब्राह्मणगाव : येथे ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थींची ड यादी प्रसिद्ध झाली असून, एकूण ६१३ लाभार्थी असताना प्रसिद्ध यादीत १४५ लाभार्थींची नावे नसल्याने सदर १४५ लाभार्थींची नावे पुन्हा समाविष्ट करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा बागलाण तालुका रिपाइंचे तालुकाध्यक्ष व उपसरपंच बापू राज खरे यांनी दिला आहे. याबाबत बागलाणच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू राज खरे यांनी दिले.

----

त्र्यंबकच्या अंजनेरी गडावर वृक्षारोपण !

त्र्यंबकेश्वर : पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अंजनेरी गडावर वृक्षारोपण केले.

याप्रसंगी संपतराव चव्हाण, अंंजनेरीचे उपसरपंच गणेश चव्हाण, सरपंच पुष्पा बदादे, वनसमितीचेे अध्यक्ष राजेंद्र बदादे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनरक्षक शिंदे, दादा भाऊसाहेब मोरे, उत्तम मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------------

Web Title: Dedication of Sanitary Napkin Vending Machine