साथी दत्ता वडगे पुस्तक पेढी-वाचन कट्ट्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST2021-07-14T04:17:15+5:302021-07-14T04:17:15+5:30

सुरुवातीस दत्ता वडगे यांचे प्रतिमेस प्रदीप कापडिया यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. पत्रकार नाना महाजन, सुभाष ...

Dedication of Saathi Datta Wadge Pustak Pedhi-Vachan Katta | साथी दत्ता वडगे पुस्तक पेढी-वाचन कट्ट्याचे लोकार्पण

साथी दत्ता वडगे पुस्तक पेढी-वाचन कट्ट्याचे लोकार्पण

सुरुवातीस दत्ता वडगे यांचे प्रतिमेस प्रदीप कापडिया यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. पत्रकार नाना महाजन, सुभाष परदेशी, अशोक पठाडे, प्रा.संताजी बाविस्कर, राष्ट्रसेवा दल जिल्हा संघटक रविराज सोनार, ॲड.एम.जी. गीते, व्यंकटेश मारू आदींनी मनोगत व्यक्त केले.

वडगेसरांची कन्या सीमा तिडके हिच्या वतीने वडिलांच्या स्मृत्यर्थ २१, हजार रुपयांची मदत विविध संस्थांना देणार असल्याचे विलास वडगे यांनी सांगितले. साधना वाचनालय, उर्दू पत्रकार संघ, राष्ट्रसेवा दल, संगमेश्वर मशीद येथे या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी प्रदीप कापडिया अकरा हजार रुपये व व्यंकटेश मारू यांनी तीन हजार रुपये पुस्तकपेढीला देणगी दिली. कार्यक्रमास कल्पना पाटील, योगेश देशावरे, राष्ट्रसेवा दल तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके, रहिम शेख, प्रवीण वाणी, सुरेंद्र टिपरे, ॲड.मनोज चव्हाण, बळवंत अहिरे, अनिल महाजन, हेमंत पूरकर, सत्यवान बच्छाव, अशोक गीते आदींसह सेवा दल सैनिक उपस्थित होते. प्रास्तविक, नचिकेत कोळपकर यांनी केले. स्वाती वाणी यांनी सूत्रसंचलन केले. पुस्तकपेढी समितीचे अध्यक्ष राजीव वडगे यांनी आभार मानले.

फोटो फाईल नेम : १३ एमजेयुएल ०२ . जेपीजी

फोटो कॅप्शन : साथी दत्ता वडगे पुस्तक पेढीच्या लोकार्पण प्रसंगी प्रदीप कापडिया, ॲड.बी.व्ही. मिस्तरी, अशोक पठाडे, सतीष जगताप, प्रवीण वाणी आदी.

130721\13nsk_2_13072021_13.jpg

फाेटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.

Web Title: Dedication of Saathi Datta Wadge Pustak Pedhi-Vachan Katta