बारागाव पिंप्रीत संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे लोकार्पण (जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे... सिमंतीनी हे नाव बरोबर आहे ना? कृपया पाहून घेणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:27+5:302021-06-01T04:11:27+5:30
या वेळी सिन्नर तालुका उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मुरकुटे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, ...

बारागाव पिंप्रीत संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे लोकार्पण (जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे... सिमंतीनी हे नाव बरोबर आहे ना? कृपया पाहून घेणे.)
या वेळी सिन्नर तालुका उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मुरकुटे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, सरपंच संध्या विजय कटके, उपसरपंच योगेश गोराडे आदी प्रमुख उपस्थित होते. कोरोना काळात गरीब व गरजू लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षासाठी गावच्या सुन्नी शाही मशीद ट्रस्टच्या वतीने ३० लीटर सॅनिटायझर व १० बेडशीट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच गावचे शिक्षक सचिन ढेंगळे यांनी १० सॅनिटायझर स्प्रे व १० मास्क कक्षास दिले. सदर कक्षाचा उपयोग गाव व परिसरातील नागरिकांनी करावा तसेच कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यास ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी सरपंच कटके यांनी केले.
कोट.....
अजूनही ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष तयार होत आहे. या कक्षांना सामाजिक संस्था, समाजसेवक व नागरिकांनी सेवाभावी हेतूने मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.
- विजय कटके, सामाजिक कार्यकर्ते, बारागाव पिंप्री.
फोटो - ३१ नायगाव विलगीकरण
सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथे दिव्यानंदजी गिरी विलगीकरण कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे, सरपंच संध्या कटके, विजय कटके आदींसह आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ.
===Photopath===
310521\31nsk_15_31052021_13.jpg
===Caption===
फोटो - ३१ नायगाव विलगीकरण सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथे दिव्यानंदजी गिरी विलगिकरण कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे,सरपंच संध्या कटके,विजय कटके आदीसह आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ आदी.