मांगीतुंगी जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:33 IST2020-08-06T22:48:36+5:302020-08-07T00:33:54+5:30

मालेगाव : मांगीतुंगी येथील जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे जैन स्थानकात आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.

Dedication of Charitable Hospital of Mangitungi Jain Trust | मांगीतुंगी जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण

मांगीतुंगी जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पणमांगीतुंगी: येथील जैन स्थानकात कै. शैलेश महाजन यांच्या स्मरणार्थ दवाखान्याचे लोकार्पण करतांना पद्मा महाजन, सी. आर. पाटील,आरती महाजन,डॉ अरूण पठाडे, डॉ सचिन जैन आदी.

ठळक मुद्देधर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण

मालेगाव : मांगीतुंगी येथील जैन ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्याचे जैन स्थानकात आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.
कै. शैलेश महाजन यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त सदर दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. या धर्मार्थ दवाखान्याचे लोकार्पण पद्मा महाजन, सी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी फोर्टचे सचिव डॉ. अरूण पठाडे, डॉ. सचिन जैन, परेश महाजन, मितेन दत्तानी, दिनेश जैन, सरपंच रमेश सोनवणे,बाळू पवार, उपसरपंच राजेंद्र निकम,केदा निकम आदी उपस्थित होते. आदिवासी व गोरगरिबांची आरोग्य सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे प्रतिपादन सन्मती ट्रस्टच्या विश्वस्त आरती महाजन यांनी यावेळी केले. गावातील जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा यांनाही वैद्यकीय साधने देण्यात आली. डॉ. विनोद गोरवाडकर यांनी सुत्रसंचालन तर राजेंद्र दिघे यांनी आभार मानले. यावेळी प्रविण वाणी, बाबुराव पवार, अनिल पवार,बाबाजी भामरे,ग्रामसेवक कुंदन गावित ,ट्रस्टचे व्यवस्थापक दिलीप जैन आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of Charitable Hospital of Mangitungi Jain Trust