शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कर्तव्यभावनेसह बांधिलकी जपावी :  विश्वास नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:25 IST

सध्याच्या संस्कृतीत जगताना कर्तव्यनिष्ठेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुसंस्कृतपणाही दाखविला पाहिजे. आपण कुठे मोठे व्हावे आणि कुठे लहान होऊन ज्ञान आत्मसात करावे याचे आत्मभान ठेवले तरी ध्येय निश्चितीची वाट अधिक सोपी होते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

नाशिक : सध्याच्या संस्कृतीत जगताना कर्तव्यनिष्ठेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुसंस्कृतपणाही दाखविला पाहिजे. आपण कुठे मोठे व्हावे आणि कुठे लहान होऊन ज्ञान आत्मसात करावे याचे आत्मभान ठेवले तरी ध्येय निश्चितीची वाट अधिक सोपी होते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.कालिदास कलामंदिर येथे रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने ज्येष्ठ उद्योजक नरेंद्र गोलिया यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयुक्त नांगरे-पाटील बोलत होते. व्यासपीठावर पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र नेहते, रोटरीच अध्यक्ष राधेय येवले, प्रांतपाल राजीव शर्मा, आशा गोलिया, रोटरीच्या सचिव मुग्धा लेले, संतोष साबळे उपस्थित होते. नाशिक शहरात आपल्या कामगिरीचे योगदान देणाऱ्या व्यक्तिला रोटरीच्या वतीने ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी आयुक्त म्हणाले, विद्वान आणि राजा यांची तुलना होऊ शकत नाही. कारण राजा राज्यापुरताच असतो तर विद्वान सर्वत्र पूज्य असतो. कौशल्य आणि संघर्षाने भारलेल्या आयुष्यातही निष्ठेने व्यवसाय आणि कर्तव्याने सामाजिक बांधिलकी जपणाºया गोलिया यांचे आयुष्य हे सर्वांना प्रेरणादायी असेच आहे. नावीन्याचा ध्यास, कौशल्याचा अभ्यास आणि निष्ठेने काम करण्याचे संस्कार जपले तर कोणतेही क्षेत्र तुम्हाला अडथळा वाटत नाही. असे नांगरे-पाटील यावेळी म्हणाले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र नेहते यांनी केले. विश्वास नांगरे- पाटील यांचा परिचय सचिन बागड यांनी तर नरेंद्र गोलिया यांचा परिचय राजेश राजेबहादूर यांनी करून दिला. सूत्रसंचालन मधुवंती देशपांडे यांनी केले, तर आभार मुग्धा लेले यांनी मानले.नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावेसत्काराला उत्तर देताना गोलिया म्हणाले, मोठे स्वप्न बाळगा, ते साकार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, नितिमत्ता जोपासली तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. परंतु त्यासाठी आयुष्यात काही तत्त्वांचा स्वीकार केला पाहिजे. शिकण्याची जिद्द, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची कला, नव्याचा स्वीकार, काम करण्याची चिकाटी तसेच प्रामाणिकपणा असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्याला संधी आहे. स्वत:मध्ये बदल करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जगही तुम्हाला सुंदर वाटेल. कारण जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सर्वकाही उपलब्ध आहे ते ओळखता आले पाहिजे, असे गोलिया म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील