शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

खरिपाच्या पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 12:30 AM

नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देसंकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज

दत्ता दिघोळे ।नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.सध्या शेतीपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकरी वर्गाने खरिपाची पेरणी व अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीनंतर अधून-मधून येणाऱ्या रिमझिम पावसाच्या पाण्यावर सोयाबीन, मका, उडीद, मूग, टमाटे, कोबी व फ्लॉवर आदी पिके तग धरून होती. तसेच सोयाबीनसह पेरणी केलेल्या कडधान्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी शेतकºयांनी केलेला खर्चही पदरात पडला नसल्याने शेतकºयांच्या डोक्यावर आर्थिक बोजाचा भार वाढला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांतून सध्या शेतकरी मार्गक्रमण करत आहे. पावसाळा संपल्यात जमा झाला आहे. परतीच्या पावसाकडे नजरा लागल्या आहेत. मात्र अद्यापही तालुक्यात जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे नदी-नाले कोरडेठाक आहेत. शेतकरी येणाºया रब्बी हंगामासही मुकण्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही येत्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहेत. (क्रमश:) गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरिपाची सर्वच पिके पाण्याअभावी शेतातच करपून गेली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या मालास बाजारात मातीमोल भाव मिळत आहे.पाण्याअभावी शेतकºयांकडून कांदा रोपांची विक्रीपाऊस सध्या परतीच्या प्रवासात आहे; मात्र तालुक्याच्या कोणत्याच भागावर तो अजूनही बरसला नाही. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतकरीवर्ग अजूनही परतीच्या पावसाची आस धरून बसलेला आहे. अनेकांनी रब्बीच्या पिकांची लागवड पाणीटंचाई लक्षात घेता थांबवली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे लागवडीसाठी आलेल्या कांदा रोपांची विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.यंदा खरिपाच्या पिकांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेतले जाते. यंदा हे पीक पावसाअभावी शेतातच करपले. जेमतेम हाती आलेल्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्याने ते तयार करण्यासाठीही शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.- एकनाथ सानप, शेतकरी, नायगाव