ओझर परीसरातील रुग्ण संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:47 IST2021-05-09T20:54:26+5:302021-05-10T00:47:32+5:30
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या दहा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी नक्कीच दिलासाजनक आहे. दरम्यान रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात ३१ नविन रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

ओझर परीसरातील रुग्ण संख्येत घट
ठळक मुद्दे२४० रुग्ण घरीच कॉरंटाईन होऊन उपचार घेत आहेत.
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या दहा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी नक्कीच दिलासाजनक आहे. दरम्यान रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात ३१ नविन रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
ओझर सह परिसरातील कोरोना बाधितांची संख्या काही दिवसांपासून घट होत असल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ओझरसह परिसरात रविवारी (दि.९) प्राप्त झालेल्या अहवालानुसार बाधित रुग्ण संख्या एकुण ४३६१ झाली आहे. पैकी १२५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला,तर ३९८५ रुग्ण बरे झाले आहेत. सद्या २६० रुग्णांवर उपचार सुरूअसून २० रूग्णालयात तर २४० रुग्ण घरीच कॉरंटाईन होऊन उपचार घेत आहेत.