शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
5
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
6
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
8
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
9
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
10
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
11
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
12
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
13
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
14
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
15
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
16
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
17
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
18
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
19
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

येवल्यात उन्हाळ कांदा आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:35 IST

येवला : कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा आवकेत घट झाली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले.

येवला : कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा आवकेत घट झाली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत मागणी चांगली होती. सप्ताहात एकूण कांदा आवक १८ हजार ६३५ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५०० ते कमाल रु. ७५०० तर सरासरी रु. ५५०० प्रति क्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक आठ हजार ४१७ क्विंटल झाली असून, कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५०० ते कमाल रु. ८२५० तर सरासरी रु. ५५०० प्रति क्विंटलपर्यंत होते. सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारीवर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक ३०४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १२०० ते कमाल रु. १७०० तर सरासरी रु. १४५० पर्यंत होते.सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती. बाजरीस स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक ११४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १०११ ते कमाल रु. १५०१ तर सरासरी रु. ११८५ पर्यंत होते.सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत वाढ झाली. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक ९९ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ३५०० ते कमाल रु. ५२१२ तर सरासरी रु. ४७०० पर्यंत होते.सप्ताहात मुगाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले. मुगास व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभाव तेजीत होते. सप्ताहात मुगाची एकूण आवक ९७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ४००० ते कमाल रु. ८००० तर सरासरी रु. ६००० पर्यंत होते.सप्ताहात सोयाबीनची आवक टिकून होती. सोयाबीनला स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक ३१३७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु.३४६० ते कमाल रु. ४२९६ तर सरासरी रु. ४२०० पर्यंत होते.सप्ताहात मकाच्या आवकेत वाढ झाली. सप्ताहात मक्याची एकूण आवक ९६२१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ८५० ते कमाल रु. १२९९ तर सरासरी रु. ११५० प्रति क्विंटलपर्यंत होते.उपबाजार पाटोदा येथे मका व भुसार धान्याचे लिलाव सुरू झालेले असून, उपबाजार अंदरसूल येथे रविवारपासून (दि. २५) मका व भुसार धान्याचे लिलाव सुरू होत आहे. शेतकरी बांधवांनी आपला मका व भुसार धान्य शेतीमाल उपबाजारामध्ये विक्रीस आणून बाजार समितीस सहकार्य करण्याचे आवाहन बाजार समिती सभापती उषा शिंदे व संचालक मंडलाने केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी