ओझरला कोरोना रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST2021-05-05T04:22:27+5:302021-05-05T04:22:27+5:30
ओझरसह परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून रोज ७० ते १२५च्या जवळपास आढळत होती. पण गेल्या तीन दिवसांपासून ...

ओझरला कोरोना रुग्णसंख्येत घट
ओझरसह परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून रोज ७० ते १२५च्या जवळपास आढळत होती. पण गेल्या तीन दिवसांपासून या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी ३६, रविवारी २४ व सोमवारी २० रुग्णांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. जनता कर्फ्यूमुळे बाधितांची संख्या घटत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूूण ४१३६ झाली असून त्यापैकी १०७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ३७५५ रुग्ण बरे झाले असून २५० रुग्ण घरीच क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत. परिसरातील एकूण कंटेन्मेंट झोन संख्या २०२० झाली असून १६१७ झोन पूर्ण झाले आहेत. तर आता अँक्टिव्ह झोन ४०३ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.