राष्ट्रीय शालेय फ्लोअरबॉलसाठी राज्याचा संघ जाहीर
By Admin | Updated: December 31, 2014 01:00 IST2014-12-31T00:57:54+5:302014-12-31T01:00:39+5:30
राष्ट्रीय शालेय फ्लोअरबॉलसाठी राज्याचा संघ जाहीर

राष्ट्रीय शालेय फ्लोअरबॉलसाठी राज्याचा संघ जाहीर
नाशिक : येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेतून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली असून, आज या संघाची घोषणा गोल्फ क्लब मैदान येथे करण्यात आली़ फ्लोअर बॉल असोसिएशनचे स्वप्नील वाळके, अश्पाक शेख, नंदकिशोर खैरनार, सुनील सोळसे यांनी या संघाची घोषणा केली़ निवड झालेला संघ याप्रमाणे - मुले - महेश डुबे (कर्णधार), आयुष बर्वे, संकेत सोनावणे, गरुदेव शिंदे, प्रसाद पवार (सर्व नाशिक), सौरभ धवन, मोझमअली शेख, सिद्धार्थ गायकवाड, वेदांत परदेशी, गौतम आचार्य (सर्व पुणे), नीलेश पाटील (जळगाव), महम्मद तलहा (औरंगाबाद)़ मुली - पूनम गवड (कर्णधार), स्रेहल वाकसे, सुश्मिता पाटील, विदुला पाटील, अपर्णा पाटील (सर्व कोल्हापूर), रिंकू खैरनार, सुंदरा पावरा, विशाखा तडवी, ज्योत्सना वळवी, प्रज्ञा मालपुरे (सर्व नाशिक), पल्लवी दहीकर, पूजा केदारे (मुंबई), वैष्णवी पाटील, कोमल दिघे़