शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

केबीसीवर हिवाळी अधिवेशनात निर्णय

By admin | Updated: November 22, 2014 00:07 IST

केबीसीवर हिवाळी अधिवेशनात निर्णय

नाशिक : राज्यातील केबीसी घोटाळ्याची मोठी व्याप्ती असून, हिवाळी अधिवेशनादरम्यान लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिली़ केबीसी घोटाळ्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांना देण्यात आले़ यावेळी त्यांनी अधिवेशनादरम्यान निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे गायकर यांनी सांगितले़ समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केबीसीची व्याप्ती मोठी असून, यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही़ तसेच शासनस्तरावर अद्याप काहीच निर्णय न झाल्यामुळे गुंतवणूक करणारे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत, तर सहा ठेवीदारांनी आत्महत्त्या केल्या आहेत़ याबाबत माजी मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा झाली आहे़ त्यांनी केबीसीची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून ठेवीदारांना रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही़ पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ठेवीदारांना त्वरित रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे़ यावेळी समितीचे उपाध्यक्ष संजय सावंत, राजेश मोरे, विजय काकडे, विजय वाहुले, अ‍ॅड़ अविनाश औटे, अनिल गरड, गिरीश अहेर, नितीन पाटील, विकी धोंडगे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)