कारसूळ येथील शाळा बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
By Admin | Updated: January 2, 2015 00:18 IST2015-01-02T00:18:37+5:302015-01-02T00:18:49+5:30
कारसूळ येथील शाळा बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

कारसूळ येथील शाळा बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
पिंपळगाव बसवंत : कारसुळ (ता. निफाड) येथील जि. प. ची प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी येत्या तीन दिवसांपासून शाळेच्या बाहेर
बसून शैक्षणिक धडे घेण्याचे आंदोलन सुरू केले आहे. आज अखेर पालकांनीही पाठिंबा देत शाळाच अघोषित बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारसुळ शाळेच्या
इमारतीची झालेली अवस्था पाहता कुठल्याही क्षणी शाळेची इमारत धोका देण्याचे चिन्ह लक्षात घेता विद्यार्थी वर्गात बसण्यास धास्तावले होते.
शाळेच्या भिंतीला पडलेले मोठे भेगा खपलेला पापा, फुटलेले कौले, वर्गामध्ये घुशी, उंदीर व सापांचा उपद्रवानेविद्यार्थ्यांनी वर्गात न बसण्याचा निर्धार करून शाळेच्या बाहेर बसले होते.
तिसऱ्या दिवशी गटशिक्षणाधिकारी के. व्ही. तुंगार यांनी याठिकाणी भेट देऊन
शाळेची पाहणी केली तसेच पर्यायी जागेत बसविण्याची विनंती
केली. मात्र एका वर्गात दोन वर्ग
बसूच शकत नाही. पालकांना
हा निर्णय मान्य न झाल्याने
अखेर पालकांनी अघोषित
शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.