शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:19 IST

प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा वाहतूक शाखेकडून अचानक स्कूल बसची पाहणी करून पडताळणी करतील. या पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित बेकायदेशीर स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या वतीने कारवाई केली जाईल,

पंचवटी : प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा वाहतूक शाखेकडून अचानक स्कूल बसची पाहणी करून पडताळणी करतील. या पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित बेकायदेशीर स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या वतीने कारवाई केली जाईल, असा निर्णय आडगाव पोलीस मुख्यालयात मंगळवारी झालेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची ग्रामीण भागासाठी पहिली बैठक आडगाव पोलीस मुख्यालयातील बहुद्देशीय सभागृहात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीचे सचिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहसचिव किरण बिडकर, पोलीस निरीक्षक अनंत तारगे, नरेंद्र भदाणे आदींसह मालेगाव तसेच जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील विविध शाळांचे मुख्याध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध संस्था प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती शाळा सदस्य तसेच स्कूल बस मॅनेजर, चालक, मालक उपस्थित होते.यावेळी बोलताना आरती सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्हा स्कूलबस सुरक्षा समिती निर्माण करण्यात आली असल्याचे सांगितले.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस सुस्थितीत पाहिजेत व चालक निर्व्यसनी आणि अनुभवी असावेत असे सांगितले. येणाºया अडचणींबाबत चर्चा करून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. प्रादेशिक परिवहन विभाग, ग्रामीण पोलीस विभाग यांच्याकडून अचानक स्कूलबस पाहणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवू नये तसेच प्रत्येक शालेय समितीने वेळोवेळी आढावा बैठक घेऊन बैठकीचा आढावा स्कूलबस सुरक्षा समितीला द्यावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी