शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित शालार्थ आयडी प्रस्तावांवर १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय शक्य ; शिक्षण आयुक्तांनी बोलावली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:51 IST

पुणे येथील शिक्षण संचालनालयाने आॅक्टोबर २०१८ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव स्वीकारण्यास बंद केल्यानंतर उपसंचालक कार्यालयातही अडकू न पडलेली प्रकरणे व नव्याने सादर होणारे प्रस्ताव यात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे शिक्षकांचे शालार्थ आयडीसह  शिक्षकांच्या इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण आयुक्तविशाल सोळंकी यांनी दि. १ व २ फेबु्रवारीला नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, १५ फेबु्रवारीपर्यंत शालार्थ आयडीची कामे पूर्ण होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देशिक्षकांचा  शालार्थ आयडीचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत शिक्षण आयुक्तांनी बोलावली 1 व 2 फेब्रुवारीला बैठक 

नाशिक : पुणे येथील शिक्षण संचालनालयाने आॅक्टोबर २०१८ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव स्वीकारण्यास बंद केल्यानंतर उपसंचालक कार्यालयातही अडकू न पडलेली प्रकरणे व नव्याने सादर होणारे प्रस्ताव यात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे शिक्षकांचे शालार्थ आयडीसह  शिक्षकांच्या इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण आयुक्तविशाल सोळंकी यांनी दि. १ व २ फेबु्रवारीला नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, १५ फेबु्रवारीपर्यंत शालार्थ आयडीची कामे पूर्ण होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.शासकीय अनुदानित माध्यमिक शाळांमधून निवृत्त शिक्षकांच्या जागांवर विनाअनुदानित शिक्षक रुजू होऊन त्यांना शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांची मान्यताही मिळाली आहे. त्यानंतर संबंधित शिक्षकांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची फाइल तयार करून शिक्षणाधिक ारी व शिक्षण उपसंचालक यांच्याकडून पडताळणी करून व त्यांची मान्यता घेऊन ती पुणे येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडे पाठविली आहे. परंतु, वर्षभरानंतरही ही प्रकरणे प्रलंबित आहे. अशाप्रकारे शालार्थ आयडी नसल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे सहाशेहून अधिक शिक्षकांचे वेतन गेल्या एक ते दीड वर्षांपासून रडले होते. त्यापैकी गतवर्षात डिसेंबरअखेरपर्यंत शिक्षण संचालकांनी केवळ अडीचशे प्रकरणांना मंजुरी दिली असून, उर्वरित साडेतीनशे प्रकरणे दि. १० जानेवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन शिक्षण संचालक कार्यालयाकडून देण्यात आले होते. परंतु, उर्वरित प्रकरणातील केवळ १० ते १५ प्रकरणांना आतापर्यंत मंजुरी मिळाली असून, २५ ते ३० प्रकरणांमध्ये उणिवा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे दि. १० जानेवारीपर्यंत शालार्थ आयडीचे काम पूर्ण होणे कसे शक्य आहे? असा सवाल शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जर संबंधित फाइल शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी तपासून पुढे पाठविल्या आहेत, तर या फाइलमध्ये त्रुटी निघण्याचे काहीच कारण नसून शासनाचा यंत्रणेवर विश्वास नसल्याने पुन्हा पुन्हा अशाप्रकारे फाइल पडताळणीचा घाट घातला जात असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याने शालार्थ आयडीसह शिक्षकांच्या इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण आयुक्तविशाल सोळंकी यांनी दि. १ व २ फेबु्रवारीला नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाºयांची बैठक बोलावली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा