शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

करवाढ रद्द निर्णय; पालकमंत्री अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:58 IST

नाशिक :महापालिका महासभेत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या करवाढ रद्दचा निर्णयाबाबत हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत पालकमंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाची कोणतीही माहिती नाही तसेच आपल्याशी चर्चा झाली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे़ शिवाय याविषयावर लवकरच सामंजस्याने तोडगा काढू, ...

नाशिक :महापालिका महासभेत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या करवाढ रद्दचा निर्णयाबाबत हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत पालकमंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाची कोणतीही माहिती नाही तसेच आपल्याशी चर्चा झाली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे़ शिवाय याविषयावर लवकरच सामंजस्याने तोडगा काढू, असेही सांगितले आहे़नाशिक महानगरपालिकेने केलेली करवाढ ही अवास्तव असून, त्याबाबत आंदोलनेही करण्यात आली होती़ आयुक्तांनी ही करवाढ नागरिकांवर लादल्याची भावना व्यक्त केली जात होती़ लोकप्रतिनिधी व आयुक्त यांच्यामध्येही करवाढीवरून संघर्ष निर्माण झाला होता़ या संंघर्षातून यशस्वी मार्ग काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे सोपविली होती़ मात्र, जळगाव महापालिकेची निवडणूक असल्याने चार महिन्यांपासून ते नाशिकला आले नसल्याने स्थानिक भाजपा पदाधिकाºयांसमवेत बैठक झाली नाही़ त्याचदरम्यान आचारसंहिता कालावधीत करवाढ रद्दच्या निर्णयासाठी महासभा बोलविली मात्र त्यामध्ये निर्णयच झाला नाही़ विधान परिषद निवडणुका संपल्यानंतर विरोधी पक्षांच्या रेट्यास्तव भाजपाने तहकूब सभा १९ जुलैला पुन्हा बोलविली होती़  तत्पूर्वी म्हणजेच १४ जुलै रोजी पालकमंत्री महाजन हे नाशिकला आले होते़ त्यांनी शासकीय विश्रामगृहावर भाजपा पदाधिकाºयांसोबत बैठक घेऊन दोन्ही बाजू ऐकून घेतल्या व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याशीही प्राथमिक स्तरावर बोलले, मात्र यावर फारशी चर्चा झाली नाही़ या बैठकीत करवाढ रद्दबरोबरच अंगणवाडी सेविका तसेच अन्य विषयांबाबत माहिती जाणून घेतली व या विषयांवर आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते़ मात्र, सध्या नागपूरला विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्री तेथील कामात व्यस्त झाल्याने महासभेच्या आत त्यांना बैठक घेऊन निर्णय घेणे शक्य झाले नाही़ याच दरम्यान, १९ जुलैला झालेल्या महासभेत भाजपा पदाधिकाºयांनी सरसकट करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला़महासभेतील सरसकट करवाढ रद्दचा निर्णय हा उत्तर महाराष्ट संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याशी चर्चा करून घेतल्याचे स्थानिक पदाधिकाºयांकडून सांगितले जाते आहे़ मात्र, या सर्व प्रकियेमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे स्वत: सहभागी असताना त्यांना माहिती देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे़महापालिकेच्या करवाढीनंतर सत्ताधारी भाजपावर चहूबाजूंनी टीका होत होती़ एकीकडे करवाढीवर आयुक्त ठाम होते, तर दुसरीकडे सत्ता असूनही भाजपा काही करीत नसल्याचा प्रचार करून विरोधकांनी हैराण केले होते़ यामुळे करवाढीबाबत काय निर्णय घ्यावा या पेचात असलेल्या भाजपाने परस्पर करवाढ रद्दचा निर्णय घेऊन शहरवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला़ मात्र पक्षस्तरावर आवश्यक ती काळजी न घेतल्याने पालकमंत्र्यांपर्यंत हा निर्णयच पोहोचला नाही़ मात्र पक्षस्तरावर ज्यांना याबाबत मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास सांगितले त्या पालकमंत्र्यांशी चर्चा न करताच हा निर्णय घेण्यात आला़विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे मी नागपूरमध्ये व्यस्त होतो़ वास्तविक आयुक्त व लोकप्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकल्यानंतर दोघेही आपल्या मुद्द्यांवर ठाम होते़ त्यामुळे करवाढीसह विविध विषयांवर समन्वयाने तोडगा काढण्याबाबत बैठक घेणार होतो़ मात्र विधीमंडळातील कामकाजात व्यस्त असतानाच महापालिकेतील महासभेमध्ये हा निर्णय झाला व याबाबत आपल्याला माहिती नव्हती़ त्यामुळे या निर्णयाबाबत काय करायचे याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ़  - गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGirish Mahajanगिरीश महाजन