शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सर्व उमेदवारांकडून रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

ठळक मुद्देगुंतवणुकी अभावी रोजगारात घट दोन लाखाहून अधिक तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत बेरोजगार तरुणांचा कौल ठरणार महत्वाचा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सर्व उमेदवारांकडून रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. नाशिक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे रोजगारासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुणांनी नावनोंदणी केलेली आहे. यात ३९ हजार २८९ विविध शाखांच्या पदवीधर तरुणांचाही समावेश आहे.  विशेष म्हणजे यात नियमित नूतनीकरण करणाºया तरुणांचाच समावेश आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांचा आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.  आजवर सत्तेत येणाºया प्रत्येक सरकारसमोर देशातील बेरोजगारी सर्वाधिक डोकेदुखी आणि कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकांमध्ये रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असून, रोजगार निर्मितीच्या मुद्द्यांवर प्रत्येक निवडणुकीत राजकारण होताना प्रकर्षाने दिसून येते. परंतु, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती होत नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढली नसून अस्तित्वात असलेल्या उद्योगांचाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊ शकलेली नसल्याने बेरोजगार तरुणांच्या नाशिक जिल्ह्यातही बेरोजगार तरुणांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 

गुंतवणुक नसल्याने रोजगारात घट नाशिक रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात रोजगारासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यातील १५ ते ५० वयोगटातील २ लाख ३१ हजार ५६४ बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक होत नसल्याने आणि उद्योगांचा विस्तार होत नसल्याने उद्योगांसह विविध अस्तापणांच्या कार्यालयांकडून मनुष्यबळाची मागणी होत नसल्याने रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकElectionनिवडणूकEmployeeकर्मचारीEducationशिक्षण