धनगर आरक्षणासाठी निश्चय मोर्चा
By Admin | Updated: December 7, 2015 22:40 IST2015-12-07T22:39:43+5:302015-12-07T22:40:44+5:30
धनगर आरक्षणासाठी निश्चय मोर्चा

धनगर आरक्षणासाठी निश्चय मोर्चा
नाशिक : धनगर जमातीस अनुसूचित जमातीच्या सवलतीची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी नागपूर येथे ८ डिसेंबर रोजी राज्यातील धनगरबांधव मोर्चा काढणार असून, त्यात जिल्ह्यातील धनगर बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या यादीत ‘धनगर’ऐवजी ‘धनगड’ लिहिल्याने हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. समाजाला आरक्षण त्वरित लागू करावे, या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चात जिल्ह्यातील बांधवांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन बापूसाहेब शिंदे, शिवाजी ढगे, गोरख गाडे, बाबा कांदळकर, नवनाथ ढगे, शंकर देवकर, हेमंत शिंदे यांनी
केले आहे.