निर्णय : बाहेरच्या व्यापाऱ्यांसदर्भात संचालक मंडळाची बैठक
By Admin | Updated: November 23, 2014 22:32 IST2014-11-23T22:32:36+5:302014-11-23T22:32:52+5:30
लासलगावी आजपासूून शेतमालाचे लिलाव पूर्ववत

निर्णय : बाहेरच्या व्यापाऱ्यांसदर्भात संचालक मंडळाची बैठक
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीनुसार उद्या सोमवारी पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी. वाय. होळकर यांनी दिली.
स्थानिक व्यापारी संघटनेचे सभासद नसल्याने लिलावात बोली लावण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नामुळे लासलगाव कृषी उत्पन्न समितीत रविवारी सकाळी बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांच्या अध्यक्षततेखाली संचालक मंडळाची सभा संपन्न झाली.
या बैठकीला उपसभापती इंदूबाई तासकर, संचालक राजाराम दरेकर, बबनराव सानप, शिवाजीराव ढेपले, भास्करराव पानगव्हाणे, शिवाजीराव तासकर, तानाजी पूरकर, नंदकुमार डागा, जयदत होळकर, बाळासाहेब क्षीरसागर, सचिन बह्मेचा, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, दिलीप गायकवाड,
छाया इकडे, प्रमोद शिंदे सुरेखा नागरे व सचिव बी. वाय. होळकर, वैभव तासकर, भास्कर इकडे आदी उपस्थित होते.बैठकीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाना दिलेल्या अनुज्ञप्तीधारक खरेदीदार व्यापाऱ्यास केवळ स्थानिक मर्चंटस असोसिएशनचे सभासद नाही म्हणून लिलावात सहभाग घेता येत नाही. याबाबत वेगळे काही करता येईल का याविषयी अधिक चर्चा करण्यात आली , व पूर्ववत पध्दतीने लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)