घोटीत पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: June 1, 2017 01:11 IST2017-06-01T01:10:53+5:302017-06-01T01:11:09+5:30

घोटी : येथील सिन्नर फाट्यावर मंगळवारी अज्ञात हल्लेखोरांनी एका घरात घुसून घरातील एका अपंग व्यक्तीसह त्याच्या मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे

Deceased father-son deadly attack | घोटीत पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

घोटीत पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

 लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : येथील सिन्नर फाट्यावर काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका घरात घुसून घरातील एका अपंग व्यक्तीसह त्याच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा हल्ला का झाला याबाबत पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घोटी-सिन्नर चौफुलीवर मंगेश मुरलीधर पवार यांचे रस्त्यालगत हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागील बाजूस ते आपल्या कुटुंबासह राहतात. आज पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागील बाजूने असलेल्या खिडकीतून प्रवेश करीत घरात झोपलेल्या मंगेश पवार व त्यांची पत्नी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान ही बाब त्यांचा मुलगा ओम याने पाहिल्यानंतर त्याने विरोध केला असता, अज्ञात हल्लेखोरांनी सर्व कुटुंबावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.
अपंग व्यक्ती असलेल्या मंगेश पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक दत्तात्रय घोगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.

Web Title: Deceased father-son deadly attack