कर्जमुक्ती योजनेने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:25 IST2020-01-27T23:19:00+5:302020-01-28T00:25:57+5:30

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या रूपाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील काळातही शेतकरी व कष्टकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Debt Relief Scheme | कर्जमुक्ती योजनेने दिलासा

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभ कार्यक्रमात मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, राजाराम माने, सूरज मांढरे, राधाकृष्ण गमे, छोरिंग दोरजे, विश्वास नांगरे पाटील, डॉ. आरती सिंह, अश्वती दोरजे, कुमार आशीर्वाद आदी.

ठळक मुद्देछगन भुजबळ : पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

नाशिक : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या रूपाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील काळातही शेतकरी व कष्टकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण व संचलन समारंभ प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, महाराष्ट्र प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले की, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकºयांचे आधार लिंकिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी वेळेत कार्यवाही पूर्ण केली असून, जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण विभाग पातळीवर कमी वेळात होणार आहे. त्याचप्रमाणे सेवा हमी कायद्यामधील पूर्वीच्या २० व नव्याने देण्यात येणाºया ८१ सेवा मिळून सेवांची शंभरी गाठणारा नाशिक हा राज्यातील प्रथम व एकमात्र जिल्हा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या मॅरेथॉन वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. सदर परेड संचलन कमांडर सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

विविध पुरस्कारांचे वितरण
कार्यक्र मप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत क्र ीडा संघटक म्हणून मीनाक्षी गवळी, आदिती सोनवणे, सुलतान देशमुख, सागर बोडके, मिताली गायकवाड यांना गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक मेहबूब अली सय्यद, हवालदार संजय वायचळे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक तर सुकदेव सुतार यांना गडचिरोली येथे विशेष सेवा दिल्याने ‘विशेष सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक विष्णू गोसावी व पोलीस निरीक्षक स्वप्नील कोळी यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस नाईक सुनील कनोजिया व हवालदर देवीदास वाघ यांना प्रशिक्षण संस्थेत उत्कृष्ट सेवा बजावल्याने बाह्य वर्गमधून केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक पदक व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Debt Relief Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.