कर्ज माफीपेक्षा कर्जवसुलीच जास्त
By Admin | Updated: June 28, 2017 00:39 IST2017-06-28T00:17:41+5:302017-06-28T00:39:58+5:30
नायगाव : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी घोषित केले असले तरी ही कर्जमाफी कमी, कर्ज वसुलीच जास्त असल्याची चर्चा नायगाव खोऱ्यात रंगत आहे.

कर्ज माफीपेक्षा कर्जवसुलीच जास्त
दत्ता दिघोळे । लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी घोषित केले असले तरी ही कर्जमाफी कमी, कर्ज वसुलीच जास्त असल्याची चर्चा नायगाव खोऱ्यात रंगत आहे. कर्जमाफीसाठी दिलेले नियम व अटींमुळे प्रत्यक्षात किती जणांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल हे सांगणे अवघड झाले आहे. शासनाने जाहीर केलेली शाब्दीक कर्जमाफी ‘सरसकट फसवी’ ठरत असल्याची चर्चा आहे. जाहीर केलेली कर्जमाफी कमी तर दिड लाख रुपयांची माफी घेण्यासाठी शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम भरण्याची अट आल्यामुळे यात बँकेची वसुलीच जास्त होणार असल्याने ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या सरसकट या शब्दांच्या खेळाची शेतकऱ्यांना सध्या चांगलीच उपरती होतांना दिसत आहे. ऐन खरीपाच्या हंगामात या माफीच्या गोंधळात बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. नायगाव खोऱ्यात यातील आठ ते दहा गावातील हजारो शेतकऱ््यांना कृषी कर्ज वाटणाऱ्या गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या १ हजार ९११ थकबाकी शेतकऱ्यांपैकी अंदाजे केवळ ९०७ शेतकरी दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. सुमारे एक हजार चार शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपयांच्या शासनाच्या कर्ज माफीसाठी पात्र ठरण्यासाठी प्रथम सुमारे २५ कोटी रुपयांचे कर्ज भरावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या या शब्दांच्या खेळाणे उर्वरीत कर्ज भरण्याचा नियम म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकरी वर्गात या कर्जमाफीचा सर्वच थरातुन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. शासनाच्या या फसव्या कर्जमाफी पासून नायगाव खो-यातील हजारो शेतकरी वंचित राहणार असल्यान सरकारने कर्जमाफीचा फेर विचार करुन सरसकट माफी करुन शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी बसवून बळीराजाला आधार देण्याची गरज असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. शेतकरी संपाच्या सुरवातीस या संपाच्या जनजाग्रुतीसाठी सोशिल मिडीयातुन जेवढा आवाज उठला तेवढाच आवाज सध्याच्या शासनाच्या फसव्या कर्जमाफी बाबत सध्या चांगलीच तीव्र प्रतीक्रि या उमटत आहे. तत्वता, अंशता, सरसकट, नियम व अटी आदी शाब्दीक खेळाची विविध मजेदार मेसेजची देवाण-घेवाण सुरु असून तरु ण शेतकरी तीव्र शब्दात शासनाच्या कर्जमाफीचा निषेध करत आहे. सुकाणु समितीच्या निर्णयाचे स्वागत करत पुन्हा होणाऱ्या संपाबाबत चर्चाही सोशिल मिडीयावर सुरू झाल्याचे दिसत आहे.