डेबिट-क्रे डिट कार्डद्वारे फसवणूक करणारा परप्रांतीय ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:02 AM2019-04-10T01:02:58+5:302019-04-10T01:04:40+5:30

    नाशिक पोलीस : बिहारमध्ये ठोकल्या बेड्याी जाणारी गोपनीय माहिती पिन क्रमांकासह संकलित करत विशेष सॉफ्टवेअर, क्लोनिंग मशीनद्वारे ...

Debit-Critical Detective by Debit Card | डेबिट-क्रे डिट कार्डद्वारे फसवणूक करणारा परप्रांतीय ताब्यात

डेबिट-क्रे डिट कार्डद्वारे फसवणूक करणारा परप्रांतीय ताब्यात

Next
ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी वळला गुन्हेगारीकडे

 

 

नाशिक पोलीस : बिहारमध्ये ठोकल्या बेड्याी जाणारी गोपनीय माहिती पिन क्रमांकासह संकलित करत विशेष सॉफ्टवेअर, क्लोनिंग मशीनद्वारे बनावट कार्डात क्लोन करून राज्यात अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या संशयिताच्या मुसक्या बिहारमधील पाटणा शहरातून नाशिक पोलिसांनी आवळल्या. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, बॅँकेच्या खात्यावर असलेली ११ लाख ५६ हजार ७४३ रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये बॅँकेच्या एटीएममध्ये अथवा घरी डेबिट, क्रेडिट कार्डावरील गोपनीय माहिती ‘हॅक’ करून अथवा नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्यामार्फत पिनकोड मिळवून चोरटे लाखो रुपयांना चुना लावत असल्याच्या तक्रारी नित्यनेमाने दाखल होत आहे. पिंपळगाव बसवंतमधील फिर्यादी संतोष पाचोरकर यांच्या खात्यावरील रक्कमेचा अज्ञात दोघा संशयितांनी अपहार केल्याची तक्रार प्राप्त होताच विविध घटनास्थळावरील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक माहितीची पडताळणी करत संशयिताची गुन्ह्णाची पद्धत जाणून घेतली. बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्णातील जामून गल्ली सब्जीबाग हा गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध धोकादायक परिसरातून संशयित जावेद वजीद खान (२४) यास स्थानिकांचा विरोध झुगारून शिताफीने बेड्या ठोकण्यात आल्या. त्याचा साथीदार मोहम्मद जावेद ऊर्फ एहसान (रा.दसरथपूर, जि.गया) हा फरार आहे.
स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी वळला गुन्हेगारीकडे
कला शाखेतून पदवी घेतलेल्या जावेदने बिहार राज्यामधील स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरू केला होता. या परीक्षा देऊन त्याला सरकारी अधिकारी व्हायचे स्वप्न होते; मात्र इंटरनेटवर सर्फिंग करताना त्याला डेबिट कार्ड क्लोनबाबतची माहिती मिळाली आणि त्याने कमी वेळेत अधिक श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी वयाची तिशी पूर्ण होण्याअगोदरच गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले.

Web Title: Debit-Critical Detective by Debit Card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.