वेळुंजे : त्र्यंबकेश्वर ते तोरंगण या एसटी बसने (क्रमांक एम.एच.०७ सी ७३०४) शुक्रवारी (दि.३०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंबई जवळ मोटारसायकल वरून जाणाऱ्या युवकाला समोरुन जोरात धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.सोमनाथ अमृता भुतांबरे (वय २२) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या त्याच्या पश्चात पत्नी,एक वर्षाचा मुलगा, तसेच वृद्ध आई,वडील असा परिवार आहे. सोमनाथला बसने धडक दिल्यानंतर तो त्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, गंभीर मार लागल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खैरे करत आहेत.
त्र्यंबकेश्वरजवळ बसच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:38 IST
अंबई जवळ मोटारसायकल वरून जाणाऱ्या युवकाला समोरुन जोरात धडक
त्र्यंबकेश्वरजवळ बसच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्देसोमनाथ अमृता भुतांबरे (वय २२) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या त्याच्या पश्चात पत्नी,एक वर्षाचा मुलगा, तसेच वृद्ध आई,वडील असा परिवार आहे