नाशिकमध्ये जलाशयात तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: July 6, 2015 02:22 IST2015-07-06T02:22:47+5:302015-07-06T02:22:47+5:30
नाशिकजवळील दुगारवाडी धबधब्याजवळील जलाशयात बुडालेला सिडकोतील (नाशिक) पवन नंदकिशोर माहेश्वरी (१९) याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. त्याच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़

नाशिकमध्ये जलाशयात तरुणाचा मृत्यू
नाशिक : नाशिकजवळील दुगारवाडी धबधब्याजवळील जलाशयात बुडालेला सिडकोतील (नाशिक) पवन नंदकिशोर माहेश्वरी (१९) याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. त्याच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़
च्पवन त्याच्या मित्रांसोबत शनिवारी सांयकाळी पोहण्यासाठी आला होता. अंधार पडल्यामुळे शनिवारी शोधकार्य थांबविण्यात आले होते.एसवाय. बी. कॉममध्ये शिकत असलेला पवन एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करून कुटुंबाला घरखर्चात मदत करत होता. (प्रतिनिधी)