विषारी औषध सेवनाने तरुणीचा मृत्यू
By Admin | Updated: April 20, 2017 18:05 IST2017-04-20T18:05:21+5:302017-04-20T18:05:21+5:30
विषारी औषध सेवनाने तरुणीचा मृत्यू

विषारी औषध सेवनाने तरुणीचा मृत्यू
नाशिक : राहत्या घरी विषारी औषध सेवन केलेल्या २० वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान बुधवारी (दि़ १९) रात्री मृत्यू झाला़ मयत तरुणीचे नाव सिमरन माजीद शेख (रा़ पंचशीलनगर, नाशिक) असे आहे़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिमरन हिने राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याने तिला उलटीचा त्रास होऊ लागला़ यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)