ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:57 IST2018-06-04T00:57:12+5:302018-06-04T00:57:12+5:30
नाशिक : दहाचाकी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून धुळे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ २) सायंकाळच्या सुमारास डीजीपीनगर आयटी पार्कसमोर घडली़ रंजना सुभाष खुळे (५७, रा़ धुळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़

ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू
नाशिक : दहाचाकी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून धुळे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ २) सायंकाळच्या सुमारास डीजीपीनगर आयटी पार्कसमोर घडली़ रंजना सुभाष खुळे (५७, रा़ धुळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़
रंजना खुळे या सायंकाळच्या सुमारास रेल्वेने नाशिकरोडला आल्या़ सातपूरला नातेवाइकास भेटण्यासाठी रेल्वेस्थानकावरून रिक्षाने (एमएच १५ ऐके ६२४७) सातपूरला निघाल्या़ रिक्षाचालक डीजीपीनगर ते साईनाथनगर चौफु लीच्या दिशेने जात असताना आयटीपार्क समोर दहाचाकी भरधाव ट्रकने रिक्षाच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिली़ यामुळे रिक्षा उलटली व रिक्षातील रंजना खुळे यांच्या छातीस जोराचा मार तसेच गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालकही जखमी झाला आहे़, तर ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला़ याप्रकरणी मयत रंजना खुळे यांचा भाऊ संजय पाटील (सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात सदोष मनुष्यवध तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़