इंदिरानगरमधील महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 25, 2015 00:16 IST2015-09-25T00:15:08+5:302015-09-25T00:16:00+5:30

नऊ महिन्यांत ४७ बळीस्वाइन फ्लूचा नववा बळी

Death of woman in Indiranagar | इंदिरानगरमधील महिलेचा मृत्यू

इंदिरानगरमधील महिलेचा मृत्यू

 नाशिक : शहरात स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतचालली असून जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या इंदिरानगर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ १ जानेवारी ते २४ सप्टेंबर या कालावधीत आतापर्यंत ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ सप्टेंबरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नऊ रुग्णांपैकी चार रुग्ण शहरातील असल्याने नागरिकांमध्ये घबराट परसली आहे़ दरम्यान स्वाइन फ्लूच्या निदानाबाबत अजूनही पुण्याचाच भरवशावर अवलंबून रहावे लागत असून नाशिकमध्ये तपासणी केंद्राची मागणी केली जाते आहे़
इंदिरानगर परिसरातील कल्पना बुद्धदेव रॉय (५३) यांना खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि़२२) त्यांचा मृत्यू झाला़ विशेष म्हणजे त्यांचा खासगी रुग्णालयातील तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये एक साधू वा चार महिलांचा समावेश आहे़ या महिलांमधील सिडकोतील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत़

Web Title: Death of woman in Indiranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.