चांदवड : येथील श्री रेणुकादेवी मंदिराजवळील तलावात पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच पोलिसांच्या मदतीने या महिलेचे शव पाण्याबाहेर काढले. तिच्याजवळील आधार कार्डवरून ओळख पटली असून, गीताबाई धोंडू कासवे (६२) रा. मालेगावकॅम्प असे या महिलेचे नाव आहे.चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
चांदवडला तलावात पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:28 IST