सटाणा : कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागल्याने अजमीर सौंदाणे येथील महाविद्यालयीन तरु णी जागीच ठार झाली. शनिवारी (दि. १५) सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.अजमीर सौंदाणे येथील प्रकाश काळू पवार यांची मुलगी संध्या (१७) ही सकाळी घराजवळ कपडे वाळत घालत होती. अचानक तिचा हात विद्युत तारेला लागल्याने तिला विजेचा जबर धक्का लागला. जखमी संध्याला उपचारार्थ एका खासगी रु ग्णालयात दाखल केले; मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:05 IST