अंबड भागात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 16, 2016 23:51 IST2016-09-16T23:51:44+5:302016-09-16T23:51:56+5:30

अंबड भागात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Death of woman by electric shock in Ambad area | अंबड भागात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

अंबड भागात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

नाशिक : अधिकृत वीज जोडणीतून भाडेतत्त्वावरील घरासाठी घेतलेल्या अनधिकृत वीजजोडणी वायरवर कपडे वाळत टाकत असताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १३) दुपारच्या सुमारास अंबडमधील दातीर मळा परिसरात घडली़ मयत महिलेचे नाव सुलेखादेवी दीपक सिंग असे असून या प्रकरणी अंबड पोलिसांनी घरमालक दत्तू अर्जुन दातीर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तू दातीर यांच्या मालकीच्या घरामध्ये सुलेखादेवी या भाडेतत्त्वावर राहत होत्या़ या घरासाठीची वीज अनधिकृत वीजजोडणीद्वारे घेण्यात आली होती़ सुलेखादेवी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुतलेले कपडे वायरवर वाळत घालीत होत्या़ ही वायर जुनी असल्याने तिचा जोड तुटला व धक्का लागून त्यांच्या मृत्यू झाला़ याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा
यांच्या फिर्यादीवरून दातीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सुरू
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death of woman by electric shock in Ambad area