शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गॅलरीतून पडल्याने युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:24 IST

दिंडोरीरोड परिसरातील तलाठी कॉलनीतील एका इमारतीच्या गॅलरीतून पडून एका १९ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंचवटी : दिंडोरीरोड परिसरातील तलाठी कॉलनीतील एका इमारतीच्या गॅलरीतून पडून एका १९ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षी सतीशराव अहिरराव असे मयत झालेल्या युवतीचे नाव आहे. ज्या ठिकाणी साक्षी जखमी अवस्थेत आढळून आली त्या ठिकाणची परिस्थिती, तिच्या अंगावरील जखमा यावरून साक्षीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मंगळवारी तलाठी कॉलनी परिसरातील चैत्रचेतन अपार्टमेंटमध्ये राहणारी साक्षी इमारतीच्या आवारात कोसळली असल्याचे पहाटे दूधवाटप करणाऱ्या इसमाला आढळून आले. त्याने इमारतीतील रहिवाशांना ही बाब सांगितली. तोपावेतो साक्षीचे वडील तिचा शोध घेत खाली आले व तिला जखमी बघून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी तिची प्राणज्योत मालवली.साक्षीने दुसºया मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर जाऊन उडी का मारली? याशिवाय इमारतीत सीसीटीव्ही बसविलेले असून फुटेज तपासणीत साक्षी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास खाली पडताना दिसते. ती पहाटेपर्यंत तेथेच विव्हळत पडलेली फुटेजमध्ये दिसते तर तिचा मोबाइल जमिनीवर पडल्याने तिचे कोणाशी बोलणे सुरू होते का याचा तपास पोलीस करत आहेत. एकूणच साक्षीच्या मृत्यूप्रकरणी सध्या पोलिसांनी अकस्मात नोंद केली असली तरी विविध प्रश्न उपस्थित झाला.ज्याठिकाणी साक्षी जखमी अवस्थेत पडली होती त्याठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सदर मुलीचा मृत्यू कशाने झाला याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू