नाशिक : गंगाम्हाळुंगी येथील विवाह समारंभ आटोपून परतणार्या वर्हाडाच्या टेम्पोला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या समाधान काशिनाथ ठमके (१६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात १६ वर्हाडी गंभीर जखमी झाले होते़गणेशगाव येथील शंकर ठमके या तरुणाचा गंगाम्हाळुंगी येथील अनिता फ साळे या तरुणाशी गुरुवारी विवाह होता़ विवाह समारंभ आटोपल्यानंतर वर्हाड परतत असताना हा अपघात झाला़ दारुच्या नशेत टेम्पो पिटाळणार्या चालकामुळे हा टेम्पो उलटल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते़दरम्यान या अपघातातील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते़ या जखमींपैकी समाधान काशिनाथ ठमके याचा उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचे निधन झाले़ दरम्यान या अपघाताची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)
वर्हाडाच्या अपघातातील जखमीचा मृत्यू
By admin | Updated: May 9, 2014 22:55 IST