दुभाजकावर आदळून दोघा युवकांचा मृत्यू

By Admin | Updated: February 2, 2016 23:48 IST2016-02-02T23:47:51+5:302016-02-02T23:48:20+5:30

दुभाजकावर आदळून दोघा युवकांचा मृत्यू

The death of two youths collapsed on the divide | दुभाजकावर आदळून दोघा युवकांचा मृत्यू

दुभाजकावर आदळून दोघा युवकांचा मृत्यू

नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडा रोड मोरे मळा मार्गे मोटारसायकलवर जाणाऱ्या दोघा युवकांनी रस्त्यामधील दुभाजकाला मंगळवारी दुपारी जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन दोघांचा मृत्यू झाला.
एकलहरा सिद्धार्थनगर झोपडपट्टी येथील रमेश पंडित बागुल (वय २७), योगेश बन्सीलाल काकळीज (वय ३४) हे दोघे मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मोटारसायकल (एमएच १५ डीटी ८८७२) हीच्यावरून भरधाव वेगात जेलरोड जुना सायखेडा रोड मोरे मळा मार्गे एकलहरा येथे जात होते. मोरे मळा येथे बोराडे समाधी मंदिराजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या या दोघा युवकांची मोटारसायकल रस्त्यामधील दुभाजकाला जोरदार आदळली. यामध्ये त्या दोघांच्या डोक्यास व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली.
आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी रमेश बागुल व योगेश काकळीज या दोघांना लागलीच बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामार्गावर तरुण मुले सुसाट दुचाकी चालवत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The death of two youths collapsed on the divide