नाशिकच्या वारकऱ्याचा वाहनाच्या धडकेने राहात्यात मृत्यू
By Admin | Updated: June 18, 2017 14:08 IST2017-06-18T14:08:13+5:302017-06-18T14:08:13+5:30
या दिंडीतील वारकऱ्यांना दुख:द अंतकरणाने वारीतून माघारी परतावे लागले़

नाशिकच्या वारकऱ्याचा वाहनाच्या धडकेने राहात्यात मृत्यू
राहाता : येथे अज्ञात वाहनाने वारकऱ्याला चिरडल्याने नाशिक येथून आलेल्या तुकारम महाराज खेडलेकर दिंडीतील वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला़ त्यामुळे या दिंडीतील वारकऱ्यांना दुख:द अंतकरणाने वारीतून माघारी परतावे लागले़
तुकाराम महाराज खेडलेकर (खेडले झुंगी, ता़ निफाड, जि़ नाशिक) हे गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरला पायी दिंडी नेतात़ या वर्षी ही दिंडी नगरमार्गे पंढरपूरकडे जाण्यास खेडले झुंगी येथून १६ जून रोजी मार्गस्थ होऊन पहिला मुक्काम देऱ्हडे मढी येथे झाला़ त्यानंतरचा दुसरा मुक्काम शनिवारी राहाता येथे झाला़ दरम्यान रविवारी सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दिंडीतील वारकरी पुढील प्रस्थानाची तयारी करीत होते़ त्याचवेळी दिंडीतील वारकरी दौलत शंकर गवळी (वय ६५, रा़ नारायन टेभे, ता़ निफाड) हे शौचालयासाठी निघाले असताना राहाता येथील न्यायालयासमोर नगर-मनमाड महामार्ग पार करीत असताना नगरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या भरगाव लक्झरीने गवळी यांना जोरदार धडक दिली़ या अपघातात गवळी गाडीखाली चिरडले गेले़ यात त्यांचा जागीच अंत झाला़ घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिसानी घटनास्थळी दाखल होत पचंनामा केला़ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दिंडीतील वारकऱ्यांना दुख:द अंतकरणाने पंढरपूरकडे मार्गस्थ व्हावे लागले़ तर दिंडीतील नारायण टेभे गावातील सुमारे ५० वारकऱ्यांना वारी अर्धवट सोडून माघारी परतावे लागले़