सुरगाणा : तालुक्यातील म्हैसखडक येथील ह.भ.प. लक्ष्मण देशमुख (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते बासूबाबा या नावाने आध्यात्मिक क्षेत्रात ओळखले जात. संत उमाकांत महाराज यांचे ते शिष्य होते. म्हैसखडक येथे त्यांनी मोठ्या श्रीदत्त मंदिराची उभारणी केली होती. महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात धरमपूर, वासदा, बलसाड या भागात त्यांचा भक्त परिवार आहे. सुरगाणा शाळा नं. १ येथील शिक्षक नाथ देशमुख यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुले, नातवंडे असा परिवार आहे.
(फोटो ०३ लक्ष्मण देशमुख)
===Photopath===
031220\03nsk_11_03122020_13.jpg
===Caption===
लक्ष्मण देशमुख.