वडाळीभोई येथील विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: January 6, 2017 00:05 IST2017-01-06T00:01:31+5:302017-01-06T00:05:04+5:30
वडाळीभोई येथील विद्यार्थ्याचा मृत्यू

वडाळीभोई येथील विद्यार्थ्याचा मृत्यू
वडाळीभोई : येथील विक्रम वसंत अहेर (१७) या विद्यार्थ्याचा बुधवारी सकाळी आकस्मिक मृत्यू झाला.
तो के. के. वाघ कॉलेज पिंपळगाव येथे अकरावी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. याबाबत परिसरात ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.
त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे कारण समजणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. सुलोचना भोये यांनी
सांगितले. (वार्ताहर)