शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

दळवट आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:32 IST

दळवट येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत दहावीत शिकत असलेल्या चेतन संजय पवार (१६) रा. लिंगामा, ता. कळवण हा विद्यार्थी सकाळी डोक्यावर पडल्यानंतर काही वेळाने त्यास उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला दळवट प्राथमिक आरोग्यकेंद्रात औषधोपचार करून अधिक उपचारासाठी कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

कळवण : दळवट येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत दहावीत शिकत असलेल्या चेतन संजय पवार (१६) रा. लिंगामा, ता. कळवण हा विद्यार्थी सकाळी डोक्यावर पडल्यानंतर काही वेळाने त्यास उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला दळवट प्राथमिक आरोग्यकेंद्रात औषधोपचार करून अधिक उपचारासाठी कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी केली आहे. दरम्यान, मयत चेतन पवार याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर जोपर्यंत चेतनच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई होऊन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने उपजिल्हा रु ग्णालयात तणाव निर्माण झाला होता. सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कुटुंबीय व नातेवाइकांना दोषींवर कारवाई करण्यात येईल व गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. यावेळी हेमंत पाटीलसह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नातेवाईक व कुटुंबीयांची समजूत काढल्याने शव ताब्यात घेण्यात आले.कळवण तालुक्यात दळवट येथे आदिवासी विकास विभागाची पहिली ते बारावीपर्यंतची शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत तालुक्यातील लिंगामा येथील चेतन संजय पवार हा इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत होता. सध्या तो दहावीत होता. रविवारी सकाळी आठ वाजता नाश्ता केल्यानंतर मित्रांसमवेत खेळत असताना चेंडू जुन्या वसतिगृहाच्या मजल्यावर गेला. चेंडू काढताना जिन्याला कठडा नसल्याने चेतन डोक्यावर खाली पडला असल्याचे समजते. मित्रांनी दवाखान्यात जाऊ असा आग्रह केला; मात्र त्याने टाळाटाळ करून निघून गेला. त्यानंतर त्याला उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने वसतिगृह अधीक्षक, स्वयंपाकी कर्मचारी यांनी त्यास दळवट येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले; परंतु प्रकृती खालावल्याने १०८ रु रुग्णवाहिकेतून कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार कैलास चावडे व अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी कळवण उपजिल्हा रु ग्णालयात धाव घेऊन मृत चेतन पवार याच्या पालकांचे सांत्वन केले.अभोणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित आदिवासी नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र झाल्याच्या दिसून आल्या. मयत विद्यार्थी चेतन पवार याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले असून, पश्चात आजी, आई, मोठा भाऊ ,बहीण असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रु ग्णालयाच्या आवारात मयत चेतन पवारच्या नातेवाइकांनी व लिंगामा गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. मयताच्या आजीने चेतनच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.दळवट शासकीय आश्रमशाळेत ३० डिसेंबर २०१४ रोजी तालुक्यातील शिवभांडणे येथील योगेश मधुकर बागुल इयत्ता १२ विज्ञान शाखा या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळीही नातेवाइकांनी घातपाताचा आरोप केला होता. चार वर्षांनंतर सकाळच्या सुमारास चेतन पवार या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने आश्रमशाळेतील व्यवस्थापन बेजबाबदार असून, कर्मचाºयांवर अंकुश नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने अलिखित घटना घडतात असा आरोप आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीचा नैसर्गिक आपत्ती, अपघाती अथवा आटोक्याबाहेरील कारणांमुळे मृत्यू झाल्यास पालकांना दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय असल्याने त्याची अमंलबजावणी करून मयत चेतन पवार याच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली. (फोटो २० कळवण, कळवण १)दळवट आश्रमशाळेतील विद्यार्थी चेतन पवार याचा मृत्यू झाल्याचे दु:ख आहे. शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्रयोगशाळेकडून मागविण्यात येणार आहे. चौकशी अंती दोषींवर कारवाई करण्यात येईल. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नांबाबत कडक पाऊले उचलली जातील. निवासी नसलेल्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई करणार असून, घटनेची सखोल चौकशी करणार.- डॉ. पंकज आशिया,सहायक जिहाधिकारी तथाप्रकल्प अधिकारी कळवण.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू