अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: July 10, 2016 01:18 IST2016-07-10T00:15:21+5:302016-07-10T01:18:56+5:30
अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर बोधलेनगर बस थांब्याजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर अॅक्टीव्हा गाडी जाऊन आदळल्याने राष्ट्रीय जलतरणपटू सौरभ हरी सोनकांबळे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बोधलेनगर येथे राहणारा आरवायके महाविद्यालयातील सौरभ हरी सोनकांबळे (१८) हा दुपारी अॅक्टीव्हा गाडी (एमएच १५, ईझेड ८०४९) वरून कॉलेजला जाण्यासाठी निघाला. त्याचवेळी बोधलेनगर बस थांब्याजवळील भर रस्त्यात उभी असलेली ट्रक (एमएच ०६ के २६६८) चालत आहे की थांबली आहे याचा अंदाज न आल्याने ट्रकला पाठीमागून अॅक्टीव्हाने जोरदार धडक दिल्याने सौरभ गंभीर जखमी होऊन मयत झाला. नाशिक जलतरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांचा तो मुलगा होता. त्याच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. अपघाताच्या घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला असून, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.