अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीसपुत्राचा मृत्यू
By Admin | Updated: November 11, 2015 22:33 IST2015-11-11T22:32:09+5:302015-11-11T22:33:36+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीसपुत्राचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीसपुत्राचा मृत्यू
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावनजीकच्या डॉ़वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय चौफुलीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़ १०) सकाळच्या सुमारास घडली़
मयत मुलाचे नाव कल्पेश अरुण वडजे (२८, रा़ आडगाव पोलीस मुख्यालय) असे आहे़ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कल्पेश दुचाकीने जात असताना एका भरधाव वाहनाने त्यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता़ ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. याबाबत
योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात
आहे. (प्रतिनिधी)